Ticker

6/recent/ticker-posts

पैशाच्या बळावर राजकीय दडपशाही व हिंसक संघर्षावर आजची निवडणूक प्रक्रिया?

पैशाच्या बळावर राजकीय दडपशाही व हिंसक संघर्षावर आजची निवडणूक प्रक्रिया?


पातूर- 
प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे 
शब्दांकन - प्रा.प्रज्ञानंद थोरात
हल्लीची निवडणूक पैशाच्या बळावर राजकीय दडपशाही व हिंसक संघर्षावर असल्याचे दिसून येते आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये २ डिसेंबर २०२५ रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या परंतु काही मतदार केंद्रातील नगरपरिषद व नगरपंचायत च्या २४ मतदार केंद्राच्या निवडणूक मध्ये काही अडचणी, तक्रारी असल्यामुळे त्या निवडणुका 20 डिसेंबरला घेण्याचा निर्णय खंडपीठाने दिला आहे. परंतु २ डिसेंबरला झालेल्या मतदानाचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर झाला असता; तो निर्णय राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ बदलला आहे. यावर सर्व आमदार, खासदार, मंत्री नाराज झालेले दिसतात. आता २४ मतदार केंद्रावरील मतदान २० डिसेंबरला होणार असून तोपर्यंत कोणताच निकाल जाहीर होणार नाही. असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. २ डिसेंबरला झालेले मतदान व २० डिसेंबरला होणारे मतदान या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. असा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.


यादरम्यान राज्यात मतदान सुरू असताना बहुतेक निवडणूक केंद्रावर पैसे वाटपाचे दृश्य दिसले आहे. बऱ्याच मतदार केंद्रावर दोन गटांमध्ये हाणामारीचा राडा पाहायला मिळाला. येथील नेत्यांनी, मंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचा कचरा केलेला दिसतो. हिंगोली मध्ये आमदार संतोष बांगर यांनी मतदाराला कोणते बटन दाबायचे आहे हे थेट मतदान केंद्रावर जाऊन सांगितले. तसेच स्वतः ईव्हीएम मशीनचा फोटो काढून निवडणूक निर्देशाचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रायगड महाडमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना या दोन गटात पिस्तूल दाखवून फार मोठा राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. बीड माजलगाव येथे पैशाच्या वाटणीवरून दोन गटात राडा होताना दिसला. त्र्यंबकेश्वर मध्ये मतदान केंद्रात भाजप व मविआ या दोन गटात राडा झाला. अकोला - अकोट मध्ये मतदान केंद्रात पैशाच्या वाटणीवरून दोन गटात राडा होऊन तणाव निर्माण झाला होता. यावेळी संपूर्ण परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. निवडणुकीत जो-तो पैशांचा खेळ करतो परिणामी इमानदार उमेदवार निवडून येत नाहीत. तर काही नेते अनेक पक्ष बदलून स्वाभीमान गहान ठेऊन, या पक्षात बरे होईल का त्या पक्षात बरे होईल का? अस
शा भटकंतीत राहतात, असे नेते जनतेचं काहीच भलं करू शकत नाहीत, परिणामी भ्रष्टाचारास अधिक वाव मिळतो.
   

                                               
अकोला जिल्ह्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग दोन धक्क्यांनी जनतेत भीती, अस्वस्थता आणि संभ्रम पसरला आहे. अकोट तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. ही घटना शहरभर धक्कादायक ठरली आणि निवडणुकीच्या वातावरणात गंभीर बदल घडवून आणला. तर AIMIM प्रभाग 15(अ) च्या उमेदवार उज्वला राजेश तेलगोटे यांचे पती राजेश तेलगोटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता कालवाडी रोडवरील रामनारायण फार्मजवळ चार–पाच अज्ञातांनी पाठीमागून लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला. तेलगोटे गंभीर जखमी अवस्थेत अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. दोन दिवसांत घडलेल्या सलग घटनांनी जिल्ह्यातील राजकारणाचा वेढा खळबळीत वळणावर चालला आहे, नागरिकांना सुरक्षा आणि शांततेबाबत भीती निर्माण झाली आहे. शहरात प्रश्न गडगडतोय — हे योगायोग आहेत की अकोल्यात निवडणूक नव्हे, तर छुप्या पद्धतीने राजकीय दडपशाही आणि हिंसक संघर्ष चालवला जात आहे? परिणामी अशा निवडणूक कार्यकाळातील संघर्षामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या