Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक दिव्यांग दिना निमित्त,महाराष्ट्र दिव्यांग संस्थेकडून,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांचा सत्कार

जागतिक दिव्यांग दिना निमित्त,महाराष्ट्र दिव्यांग संस्थेकडून,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांचा सत्कार


 वाशीम : दि.०३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमिवर,जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाविषयी सहानुभूती बाळगून,सदैव दिव्यांग बांधवाना आपुलकी,प्रेम,सौजन्य व सहकार्याच्या भूमीकेतून मदत करणाऱ्या,वाशीम जिल्हा सामान्य रुग्नालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांची जिल्ह्यातील दिव्यांगाच्या अग्रणी असलेल्या,महाराष्ट्र दिव्यांग संस्थेच्या कारंजा येथील संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे तथा पदाधिकारी तालुकाध्यक्ष ब्रम्हदेव पाटील बांडे,संचालक सुरज नंदकिशोर कव्हळकर यांनी जागतिक अपंग दिना निमित्त सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सविनय सत्कार केला.सोबतच जिल्हा सामान्य रुग्नालयाचे अस्थिरोग तज्ञ डॉ.वैभव मेसरे यांचे सुद्धा अभिनंदन करून आभार मानले.यावेळी बोलतांना महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष संजय कडोळे म्हणाले की, "जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या कारकिर्दीत दिव्यांगाच्या युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्रा करीता दर महिन्याला प्रत्येक बुधवारी अखंडपणे दिव्यांग तपासणी शिबीर नियमीत पार पडीत असून,दिव्यांग बांधवांना जिल्हा रुग्नालयाकडून चांगली सेवा मिळत असल्याने त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.तसेच यापुढे जिल्ह्यातील गोरगरीब,निराधार,वयोवृद्ध व गरजू दिव्यांगासाठी,प्रत्येक तालुका स्तरावर उप जिल्हा रुग्नालयात दिव्यांगांची तपासणी करून युडीआयडी कार्ड देण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरे यांचेकडे लावून धरली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या