Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकाराचे व्हॉट्सअॅप खाते पुन्हा बंद — आवाज दडपण्याचा प्रयत्न? डिजिटल लोकशाहीवर गंभीर प्रश्न..!

पत्रकाराचे व्हॉट्सअॅप खाते पुन्हा बंद — आवाज दडपण्याचा प्रयत्न? डिजिटल लोकशाहीवर गंभीर प्रश्न..!


अकोला प्रतिनिधी

अकोला : जनतेच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि प्रशासनातील त्रुटी ठळकपणे मांडणारे पत्रकार पूर्णाजी खोडके यांचे व्हॉट्सअॅप खाते दुसऱ्यांदा पुन्हा बंद करण्यात आले असून, कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण न देता ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे त्यांचे संवाद, बातमी आदानप्रदान आणि सामाजिक कार्य पुन्हा ठप्प झाले आहे.



पूर्णाजी खोडके म्हणाले, ही केवळ खाते बंद करण्याची कारवाई नाही; हा लोकांच्या आवाजावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न आहे. मी प्रशासनातील अन्याय व शेतकऱ्यांच्या समस्या बोलतो म्हणून खाते सतत बंद करणे म्हणजे लोकशाहीला गळा घोटण्यासारखे आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी सत्य बोलणे मी थांबवणार नाही. असे खोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


सायबर तज्ज्ञांच्या मते, पत्रकारितेशी संबंधित किंवा मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणारे संदेश कधी कधी अल्गोरिदम चुकीने bulk message समजतो आणि खाते आपोआप बंद केले जाते. भारतात दर महिन्याला लाखो खाती अशाच कारणाने बंद केली जातात, ज्यात अनेक निर्दोष नागरिकांचा समावेश असतो...

या कारवाईनंतर पत्रकार व नागरिकांमध्ये संताप उसळला आहे...स्थानिक पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला .
पत्रकारच जर अशा प्रकारे गप्प बसवले जात असतील, तर सामान्य नागरिकांचे काय..? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे ...

सरकारने आता अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आणून, नागरिकांसाठी पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था उभा करणे अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे..
डिजिटल माध्यम हे आजचे लोकशाहीचे शस्त्र आहे ... 
आणि तेच शांत केले जात आहे, ही लोकशाहीची धोक्याची घंटा आहे .असे नागरिक अकोल्यातील व पत्रकारांच्या वतीने बोलले जात आहे.



सरकारी यंत्रणा आणि सायबर विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रकरणाची चौकशी करावी, चुकीच्या अल्गोरिदममुळे खाते बंद झाल्यास तात्काळ पुनर्संचयित करावे. पत्रकारितेवरील डिजिटल निर्बंध रोखण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण प्रणाली उभी करणे आणि अशा कारवायांवर पारदर्शक नियंत्रण आवश्यक आहे.. असेही पत्रकारांच्या वतीने बोलले जात आहे..

बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या