Ticker

6/recent/ticker-posts

काळे झेंडे दाखवण्याआधीच रयत शेतकरी संघटनेचे खोडके अटकेत, पण उपमुख्यमंत्री प्रवास ‘मृत्यू मार्गावरून’..!

काळे झेंडे दाखवण्याआधीच रयत शेतकरी संघटनेचे खोडके अटकेत, पण उपमुख्यमंत्री प्रवास ‘मृत्यू मार्गावरून’..!


अकोला प्रतिनिधी

अकोला : जिल्ह्यातील दहिहंडा–फाटा–गोपालखेड हा खड्डेमय, जीवघेणा आणि ‘मृत्यू मार्ग’ म्हणून ओळखला जाणारा रस्ता आज राजकीय संतापाचा केंद्रबिंदू ठरला आहे... उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आजच्या जिल्हा दौऱ्यात रयत शेतकरी संघटनेकडून काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार असल्याची घोषणा संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी आधीच केली होती...

मात्र आंदोलन काळे झेंडे दाखवण्या अगोदरच सुरू होण्याआधीच सकाळी अंदाजे ९ ते १० वाजताच्या दरम्यान खोडके यांना दहिहंडा पोलिसांनी ताब्यात घेत अटक करून नजरकैदेत ठेवले. त्यामुळे परिसरात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे...



काम शून्य… आश्वासने मात्र ढिगाने! — खोडके

ताब्यात घेण्यापूर्वी खोडके म्हणाले –
“अनेक महिन्यांपासून निवेदनं, अल्टिमेटम, बैठकांमध्ये आश्वासने… पण प्रत्यक्षात रस्ता एक इंचही पुढे नाही! प्रशासन झोपेत आहे की मुद्दाम जनतेला त्रास देतंय? म्हणून आम्ही काळे झेंडे दाखवणार होतो… पण आवाज दाबण्यासाठी अटक? हा लढा शांत बसणार नाही — पुढचा टप्पा म्हणजे महामार्ग बंद आंदोलन!”


“शेकडो जीव धोक्यात — म्हणून आंदोलन अपरिहार्य”

स्थानिक नागरिकांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले —
“दररोज अपघात, जखमी आणि मृत्यू… तरी अधिकारी शांत! आता संघर्ष वाढणार.”



📌 मुख्य मागण्या :

दहिहंडा–फाटा–गोपालखेड रस्त्याचे दर्जेदार नव्याने डांबरीकरण

निष्क्रिय अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई

शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई

तातडीची बैठक आणि अंतिम निर्णय


प्रशासन हादरलं… पण प्रश्न कायम!

सर्वात लक्षवेधी म्हणजे —
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा ताफाही आज याच खड्डेमय, धोकादायक रस्त्यावरून गेला..!


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या