Ticker

6/recent/ticker-posts

महिला दिनानिमित्त आयोजित साडी वॉकेथॉन 2.0 ला मातृशक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला दिनानिमित्त आयोजित साडी वॉकेथॉन 2.0 ला मातृशक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रतिनिधी 
मूर्तिजापूर: येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अटल फाउंडेशन अकोला, ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था, हॅपी वुमन्स क्लब आणि ओम योग प्रतिष्ठान मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साडी वॉकेथॉन 2.0 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, 9 मार्च रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णा सिंह त्रिपाठी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल कुलथिया, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे यांनी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.


यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा नेत्या सौ. नूतन हरीश पिंपळे, अटल फाउंडेशन अकोला जिल्हाध्यक्ष सौ. रुपाली तिडके, ज्ञान नर्मदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विष्णू लोडम, हॅप्पी वुमन्स क्लबच्या सुनिता लोडम, अटल फाउंडेशन कार्याध्यक्ष डॉ. स्वाती पोटे, तालुका अध्यक्ष कविता साखरे, शहराध्यक्ष माया दवंडे, दिनेश श्रीवास, युवती तालुका अध्यक्ष शिवकन्या शिवानी श्रीराव, सोनल बांगड आदी मान्यवरांची होती. वॉकेथॉन रॅलीला भाजपा नेत्या सौ. नूतन हरीश पिंपळे, सौ. शिल्पा तिडके, तसेच अटल फाउंडेशनच्या अकोला जिल्हाध्यक्ष सौ. रूपाली तिडके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी टी मॉल मार्गे जुना अकोला नाका आणि डीपी रोड तिडके नगर येथून आशीर्वाद लॉन येथे समाप्त झाली, जिथे विविध सांस्कृतिक व समाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर तेजस्वी जगताप, मुंबई वृत्तवाहिनी ब्युरो चीफ यांच्या मातोश्री उषा किर्दक यांचा सत्कार करण्यात आला. दर्यापूर येथील पर्ल ओएस्टर स्कूलच्या महिला शिक्षकांनी सामाजिक नृत्यातून महिलांना साक्षर आणि स्वावलंबी बनण्याचा संदेश दिला. लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. दिपाली शेळके, डॉ. पुजारी आणि कर्मचारी यांनी महिलांचे शुगर व बीपी तपासून आरोग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अटल फाउंडेशन, हॅपी वुमन्स क्लब, ओम योग फाउंडेशन, सिटी टायकोंडो क्लब आणि स्वच्छता अभियान मूर्तिजापूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन शिवकन्या शिवानी श्रीराव यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता साखरे यांनी मानले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या