वैष्णवी लव्हाळे ची अमरावती येथे झालेल्या स्पर्धेत दमदार कामगिरी
अकोला येथील रामनगर मध्ये राहणारी व नेहमीच धावण्याच्या स्पर्धेत आपले अवलस्थान कायम ठेवत दर्जेदार कामगिरी मुळे प्रकाश झोतात आलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व वैष्णवी लव्हाळे हिने अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे झालेल्या 42 व्या कॉलेगिअटे वार्षिक अँथलेटिक स्पर्धेमध्ये रामराव देशमुख आर्ट अँड इंदिराजी कपाडिया कॉलेज बडनेरा यांच्या वतीने सहभाग नोंदवत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून लांब उडी मध्ये पहिला क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची आणि रिले मध्ये दुसरा क्रमांक पटकावून अतिशय गगनचुंबी यशस्वी कामगिरी केली. या अगोदर वैष्णवी लव्हाळे हिने धावण्याच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सहभाग नोंदवत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून बक्षिसे मिळविले आहेत.व अकोल्याची बुलेट ट्रेन म्हणून प्रसिद्धी सुद्धा मिळवली.
अतिशय कमी वयात आभाळाकडे झेप घेण्याचे जे स्वप्न तिचे होते ते तिने साकारले याचे सर्व श्रेय तिच्या आईला ममता लव्हाळे याना देते.तसेच पडद्यामागचे नायक तिचे गुरू प्रशिक्षक अतुल पाटिल व गणेश मारके यांचे सुद्धा तिच्या यशामागे महत्त्वाची भूमिका आहे.येत्या काळात तिने असाच मन लावून आपल्या देशा कडून खेळावे एशियन ओलंपिक पर्यंत मजल मारावी अशी तिच्या आईची इच्छा आहे.तिचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता पाठिंबा सुद्धा आहे.आताची तिची कामगिरी पाहता येत्या काळात नक्कीच ती आपल्याला भारत देशाकडून खेळताना दिसेल असा विश्वास तिच्या प्रशिक्षकाकडून व्यक्त होत आहे.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या