पोलीस उपनिरीक्षक रणजीत खेडकर सेवानिवृत्त
मुर्तीजापूर
प्रतिनिधी नागोराव तायडे
सेवानिवृत्त रणजीत अजाबराव खेडकर यांचे मूळ गाव करतखेडा बाजार ता. दर्यापूर जि अमरावती हे असून त्यांचे वडील जिल्हा परिषद शाळे मध्ये शिक्षक असल्याने प्राथमिक शिक्षण ग्राम कुपटा जि.वाशीम त्यांनंतर कावसा ता अकोट मध्ये व महाविद्यालयीन पदवी शिक्षण शिवाजी महाविद्यालय अकोट व अकोला शिक्षण सुरु असतांना 15.10.91 रोजी पोलीस सेवेत रुजू झाले. पहिले नेमणूक अकोट पोलीस स्टेशन 1994 झाली त्यांनी अकोट संवेदनशील शहरात सर्वात जास्त नोकरीं केली, तसेच बाळापूर, मूर्तिजापूर,हिवरखेड, तेल्हारा, मूर्तिजापूर, येथे पोलीस सेवा दिली हिवरखेड पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या अडगाव येथे असलेल्या पोलीस चौकीमध्ये सतत सहा वर्ष नोकरीं केली त्यांची बदली झाल्याने अडगाव येथील प्रतिष्ठित लोकांचे विनंती वरून कामाची पात्रता पाहता पोलीस अधीक्षक विरेंद्र मिश्र सा.यांनी सहा महिने वाढीव दिले.मा. पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकिशोर मीना यांनी तेल्हारा येथून खदान पोलीस स्टेशन अकोला येथील झालेली बदली रद्द करून अकोट शहर मधील उत्कृष्ट सेवा पाहून अकोट येथे बदली केली. अकोट मधील नोकरीं दरम्यान गोरक्षा चोरी, दरोडा, अपहरण,गुन्ह्यात त्यांनी उत्कृष्ट कामे केलीत. अकोटशहरातील कोर्ट आदेशाने धार्मिक स्थळें निष्कासित/पाडण्याचा बंदोबस्त दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू न देता त्यांचा मोठा चांगला सहभाग राहिला.त्यांचे अकोट मधील चांगले काम पहाता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी बाहेर पोलीस स्टेशन येथे नियुक्ती असल्यावर सुद्धा गणपती, दुर्गा माता इतर बंदोबस्त करिता अकोटला ड्युटी करिता बोलाविले. तसेच हिवरखेड पोलीस स्टेशन नोकरींचे काळात अडगाव बु पोलीस चौकीमध्ये प्रभावी नोकरीं करून सर्वच समाजाचे लोकांचे मनात रणजित खेडकर नाव कायम अडगाव बु ता. तेल्हारा गावामध्ये आजपर्यंत निघते.त्यांनी आजपर्यंत 27 वेळा अतिदुर्मिळ असलेले ओ निगेटिव्ह रक्त देऊन बरेच लोकांना जीवदान दिले. त्यांनी मुर्तिजापुर पोलीस स्टेशन येथे अल्पवधीतच आपल्या कार्याचा प्रभाव टाकत सर्वांशी सलोख्याचे नात तयार केले,नंतर मुर्तिजापूर ग्रामिण पोलीस स्टेशनला ते पोलीस उपनिरीक्षक पदावर असतांना आपल्या कार्याने,लोकांना अधिकारी कर्मचारी यांना प्रभावित केले,त्यांनी पोलीस आणी जनता यांचा समन्वय साधुन योग्य कार्य केले त्यांची,31.10.25 रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन मधे अल्पदिवसात योग्य नोकरीं केल्याने लोकांना आपलस केल ते 34 सेवा देऊन सेवानिवृत्त झाले. त्याबाबत दि.1/11/2025 रोजी मुर्तिजापुर ग्रामिण पोलीस स्टेशन मध्ये त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमा चे अध्यक्ष श्रीधर गुठ्ठे मुर्तिजापूर ग्रामिण ठाणेदार, प्रमुख उपस्थिती ठाणेदार श्री. अजीत जाधव पोलीस. स्टे मुर्तिजापूर शहर तसेच एपीआय पवार,पि एस आय सुर्यवंशी, वानखडे,राठोड, मानकर तसेच प्राध्यापक श्री. कोल्हे सर, देशमुख सर डॉ. विशाल इंगोले व अडगाव,अकोट, अकोला येथील प्रतिष्टीत नागरिक व पोलीस कर्मचारी हजर होते, अधिकारी , पत्रकार व नागरिकांनी आपल्या भाषणात खेडकर सरांचे विशेष कौतुक करीत,त्यांच्या सेवेबद्दल आभार मानत आपल्या सारखे छान व्यक्तीमत्व हे कधी कधीच सोबत मिळतात असे मनोगत व्यक्त करून त्यांचा सहपरिवार सत्कार केला. संचालन Asi विजय मानकर व आभार प्रदर्शन HC मनिष मालठाणे यांनी केले करुन आभार मानले,या कार्यक्रमासाठी त्यांचे नातेवाईक ईष्टमंडळी,मित्र मंडळी पोलीस अधिकारी कर्मचारी,होमगार्ड सैनिक, पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते,,


0 टिप्पण्या