Ticker

6/recent/ticker-posts

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित : वंचित बहुजनचे कार्यकर्ते आक्रमक

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित : वंचित बहुजनचे कार्यकर्ते आक्रमक 


फेसबुक पेज संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करा


नासीर शेख 
खेट्री : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, व युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याविरुद्ध अत्यंत अश्लील व बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याने पातुर येथील विजय समाधान बोरकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, यांना पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यामार्फत २ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की “द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी”, “विदर्भाचं राजकारण”, “महाराष्ट्राचा विश्वास”, “देवाभाऊ” व “वर्धा लाईव्ह” या फेसबुक पेजेसवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्याविरुद्ध अवमानकारक व द्वेष निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित झाले. त्यामुळे समाजातील भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधितांवर भारतीय न्याय संहिता तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईची मागणी पातुर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. निवेदन देता वेळी तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ ,
शरद सुरवाडे, राजू बोरकर, दिनेश गवई, राजेश महल्ले, हिरासिंग राठोड, अनिल राठोड, संजय पाचपोर, निवृत्ती बरडे, मंगला इंगळे, संजय लोखंडे, शीलवंत उपरवट, रितेश फुलारी, योगेश इंगळे, मोहन गाडगे, टी टी खान, राजेश तायडे ,अक्षय राठोड, हाजी नूर खान, लावण्य अतकर, निखिल उपरवट, आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या