Ticker

6/recent/ticker-posts

दोन कारची समोरासमोर धडक : अनेक जण जखमी

दोन कारची समोरासमोर धडक : अनेक जण जखमी 


पातूर वाडेगाव मार्गावरील बाभूळगाव जवळील घटना


नासीर शेख 
खेट्री : पातुर वाडेगाव मारगावरील बाभूळगाव जवळील दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक झाल्याने दोन जण गंभीर तर अनेक जण जखमी झाल्याची घटना २ नोव्हेंबर रोजीच्या दुपारी घडली आहे. पातुरहून बाळापुर कडे जाणारी व बाळापूरहून पातुर कडे येणारी अशा दोन कार मध्ये समोरासमोर भीषण धडक झाली, या भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील पुंडलिक इंगोले, आणि मो.जुनेद हे दोन जण गंभीर झाले असून, त्यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तसेच जवळपास १५ जण किरकोळ जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बंडू मेश्राम, पोलीस हेडकॉन्स्टेबल सत्यजित ठाकूर, वाहतूक पोलीस ठाकूर, आदी घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ जखमींना रुग्णालयात रवाना केले, अपघात झाल्यानंतर काही वेळापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली, सदर घटना पातुर वाडेगाव मार्गावरील बाभूळगाव जवळील एका वळणावर झाली आहे. याप्रकरणी पातुर पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या