भारतीय जनता पक्ष लढणार 131 जागा असून 11 ठिकाणी अपक्षांना देणार पाठिंबा
अकोला
भारतीय जनता पक्षाने पाच नगरपरिषद आणि एक पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व समाजाला व ओबीसीला प्राधान्य देण्यात देण्यात आले असून मराठा पाटील, माळी, कुणबी , तेली , बारी, अनुसूचित जाती समाजाला प्राधान्य दिले असून 142 सभासदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष 131 जागा लढणार असून 11 ठिकाणी अपक्षांना भारतीय जनता पक्ष पाठिंबा देणार आहे.
भाजपाचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व अकोला जिल्हा प्रभारी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री आकाश फुंडकर, संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांची मान्यता घेऊन तसेच पक्षाचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर, विजय अग्रवाल, डॉक्टर अमित कावरे, किशोर पाटील, जयश्रीताई फुंडकर योगेश गोतमारे श्रीकृष्ण चव्हाण व पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांची चर्चा विनिमय करून 131 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये सर्वसाधारण 33 ओबीसी 31 महिला 65 एस सी 16 एसटी 3 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा तसेच पक्षाशी विचारधाराशी बांधिलकी तसेच विकास आणि कर्तुत्व, याचा विचार करून पक्षाने नवीन जोमाचे उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली असून या निवडणुकीमध्ये पक्षाने पक्षाच्या वरिष्ठ आदेशानुसार आपल्या महायुतीच्या घटक पक्षावर टीका टिपणी न करता विकास आणि सामाजिक समरसतेसाठी उमेदवारी ची घोषणा करण्यात आली आहे एकूण 142 या निवडणुकीस 131 नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात उभे केले आहे .
बाळापुर नगरपरिषद मध्ये दोन उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तर अकोट मध्ये 17 पैकी सात जणांना तिकीट देण्यात आली आहे तेल्हारा 2 जणांना तिकीट देण्यात आली आहे. तर मुर्तीजापुर मध्ये सात पैकी पाच जणांना पुन्हा तिकीट देण्यात आली आहे तर बार्शीटाकळी तीन पैकी 3 तिकीट देण्यात आली आहे
यामध्ये तेरा अल्पसंख्याक यांनासुद्धा प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.



0 टिप्पण्या