पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे सोयाबीन चोरी मधील आरोपी अटक
प्रतिनिधी- संतोष माने
पोलीस स्टेशन एमआयडीसी अकोला येथे दिनांक 02/08/25 रोजी रात्री दरम्यान फिर्यादी मनोज छगन व्यास यांचे वखार महामंडळ, एमआयडीसी क्रमांक 4, अकोला यांचे अधिनस्त गोडाऊन मध्ये ठेवलेले सोयाबीन चे एकूण 49 कट्टे (पोते) कि.अ. 1,31,839/- रू चे कोणीतरी अज्ञात इसमाने गोडाऊनचे शटर वाकून चोरी करून नेल्याचा जबाणी रिपोर्ट दिल्याने गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला असता सदर गुन्ह्यांमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शेख फैजान शेख जामीन रा. फिरदोस कॉलनी, अकोला व आरोपी इम्रान खान अयाज खान रा. नया बैदपुरा अकोला यांना अटक करून त्यांच्या कडून सदर गुन्ह्यातील सोयाबीन चे 49 कट्टे (पोते) कि.अ. 1,31,839/- रू चे जप्त करण्यात आले. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत रेड्डी साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन एमआयडीसी चे ठाणेदार सपोनि राहुल जंजाळ व तपास पथकातील पोहेकाॅ विजय अंभोरे, पोकाॅ भूषण सोळंके, भगवान आकमार यांनी केली.


0 टिप्पण्या