पातूर येथे दोन गटात हाणामारी अनेक जख्मी
पातूर ( प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे)
अकोला जिल्हयातील पातूर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २२/०९/२५ रोजी रात्री अंदाजे आठ ते साडे आठ चे दरम्यान पैशाच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली असे पोलीस सूत्रांकडून समजते. पहिल्या गटातील फिर्यादी नामे सय्यद युनूस सैयद रहीम वय ४५ व्यवसाय मजुरी राहणार जेमदार प्लॉट पातूर जिल्हा अकोला या फिर्यादी चे तक्रारी वरून आरोपी १) शेख शाहरुख शेख बिस्मिल्ला वय ३२ वर्ष २) शेख अवेस शेख बिस्मिल्ला वय ३० वर्ष ३) शेख सलमान शेख बिस्मिल्ला वय ३४ वर्ष है सर्व राहणार बादशाह नगर पातूर जिल्हा अकोला यांचेवर कलम नंबर , 109( 1),118( 1 ) , 352, / 3 ( 5) हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी सैयद युनूस सैयद रहीम यांचे क्वालिटी हॉटेल समोर रात्री ८ ते साडे आठ चे दरम्यान पैशावरून वाद झाले असतात तो वाद विकोपाला गेला असता दोन्ही गटात हाणामारी चे रूपांतर होऊन काही जन जख्मी झालेत. दुसऱ्या गटातील फिर्यादी नामे १) शेख शाहरुख शेख बिस्मिल्ला वय ३२ वर्ष व्यवसाय मजुरी राहणार बादशाह नगर पातूर यांचे तक्रारी वरून आरोपी १) सैयद सलीम घोडेवाले वय ४२ वर्ष २) सैयद युनूस वय ४५ वर्ष ३) सैयद आसिफ वय ३८ वर्ष ४) आजम अली वय ३० वर्ष सर्व राहणार जेमदार प्लॉट पातूर जिल्हा अकोला तक्रारीचे घटनास्थळ लाला चाचा यांच्या घराजवळ बादशाह नगर पातूर येथे पैशावरून वाद झाला असतात तो वाद विकोपाला गेला असतां यामध्ये दोन्ही गटातील आरोपी जख्मी झालेत असे पोलीस सूत्रांकडून समजते असता फिर्यादी शेख शाहरुख शेख बिस्मिल्ला यांचे तक्रारी वरून आरोपी १) सैयद सलीम घोडे वाला वय ४५ वर्ष २) सैयद युनूस वय ४५ वर्ष ३) सैयद आसिफ वय ३८ वर्ष ४) आजम अली वय ३० वर्ष यांचेवर भादवी कलम नंबर 109 ( 1), 118 ( 1)118 ( 2) 352 , 3 ( 5) असे गुन्हे दाखल करून पातूर पोलीस स्टेशन चे तपास अधिकारी PSI मेश्राम साहेब करीत आहेत.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


0 टिप्पण्या