Ticker

6/recent/ticker-posts

आदिगुंज.बहुउद्देशिय संस्थेद्वारा जि. एन.डान्स स्टुडिओ प्रस्तुत गरबा व दांडीया प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

आदिगुंज.बहुउद्देशिय संस्थेद्वारा जि. एन.डान्स स्टुडिओ प्रस्तुत गरबा व दांडीया प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


प्रतिनिधी संजय कडोळे
 कारंजा (लाड) स्थानिक आदिगुंज बहुउद्देशिय संस्था कारंजा द्वारा संचालित जि.एन. डान्स स्टुडिओ प्रस्तुत गरबा व दांडीया 15 दिवसीय प्रशिक्षण शिबिर सीजन 4. कारंजा (लाड) येथील G.N. dance. जि. एन.डान्स स्टुडिओ तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठया उत्साहात येथील प्रतिष्ठित ठिकाण साई संकुल बायपास मंगरूळपीर रोड व. गणपती मंदिर साळीपुरा कारंजा येथे खास महिलांकरिता विशेष प्राविण्य प्रशिक्षकासह मोठ्या उत्साहाने प्रशिक्षण दिल्या जात आहे. या मध्ये गुजरात मधील नामांकित प्रशिक्षक किरण पुरोहित सर, दृष्टी पटेल मॅडम, नवसारी सर सुरत, अक्षय राऊत गुरु वाशीम महाराष्ट्र, बालकृष्ण गौर वापी गुजरात, हनी राठोड सर, अर्पिता मौर्य मॅडम अहमदाबाद हे प्रशिक्षक महिला प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट असे प्रशिक्षण कारंजा येथे देत आहे. कारंजा परिसरातील बहुसंख्य महिला व मुली या मध्ये सहभागी होऊन यशस्वी असे प्रशिक्षण घेत आहे. व यामध्ये विशेष आकर्षण म्हणून रील स्टार वाशीमची पियू यांनी या शिबिराला विशेष भेट देऊन सर्व चाहत्यांना आपल्या कलेचे प्रदर्शन करून सर्वांना मंत्रमुघ्ध केले.


या कार्यक्रमाचे आयोजक जि. एन. डान्स स्टुडिओ चे संचालक गगन रायसर व नम्रता राठोड मॅडम यांनी व ग्रुप चे सर्व सदस्य हे अथक घेत आहे दिनांक 07 सप्टेंबर 2025 रोजी उद्घाटन प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून सर्व प्रशिक्षक तसेच ग्रुपच्या शीतलताई काकडे, रश्मीताई उज्जेंनकर ईशाताई नांदुरकर, शीतलताई कडेल, पूजाताई कडेल, अर्चनाताई कदम, वंदनाताई खंडारे, दीक्षा ताई वरघट, प्रणिताताई दसरे, कविताताई पाठक, नीताताई बोनकिले, शीतलताई वरघट, पायलताई तिवारी इत्यादीच्या उपस्थितीत पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन निकिता पटेल यांनी केले. या कार्यक्रमाला जि. एन. डान्स स्टुडिओचे सर्व सभासदांनी उपस्थित राहून सहकार्य केले. असे वृत्त ज्ञानेश्वर खंडारे यांनी कळवीले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या