मुस्लिम समाजाचे पोलिस अधीक्षकांना निवेदन, बलात्कार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी
प्रतिनिधी नौशाद पटेल
अकोला, 11 सप्टेंबर
दिनांक 06 सप्टेंबर 2025 रोजी अकोला जिल्ह्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन व गरीब कुटुंबातील मुलीवर बलात्कार व लैंगिक छळाची गंभीर घटना घडली. या जघन्य प्रकाराविरोधात अकोला मुस्लिम समाजाने आज पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले.
या प्रसंगी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मुफ्ती अशफाक कासमी, जमाते इस्लामी हिंदचे वरिष्ठ सदस्य वझीर जनाब, मरकजी अहले सुन्नतचे अध्यक्ष हाजी मुदाम खान, कच्छी मशीद ट्रस्टचे अध्यक्ष व समाजसेवक जावेद जकरिया, जमाते इस्लामीचे शहराध्यक्ष डॉ. अहमद उरूज, जिल्हाध्यक्ष जमाते इस्लामी हिंद इरफान खान, तसेच सैयद नदीम आणि शाहिद खान उपस्थित होते.
सविस्तर वृत्त येथे ☝️ पहावे
सर्व प्रतिनिधींनी या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आणि म्हणाले की –
“गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असो, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे शैतानी कृत्य करणारा कुठल्याही समाजाचा नसतो. इस्लाम धर्म अशा पापी कृतींना विरोध करतो. आमचा समाज पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील.”
समाज प्रतिनिधींनी प्रशासनाकडे मागणी केली की पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा आणि दोषींना कायद्याअंतर्गत कठोरात कठोर शिक्षा व्हावी.



0 टिप्पण्या