महेश नवमी शोभायात्रेचे आ. पठाण यांनी केले स्वागत
अकोला : सकल माहेश्वरी समाजाचा वंशोत्पती दिवस म्हणून महेश नवमी निमित्त बुधवारी भगवान महेश यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. माहेश्वरी समाज ट्रस्ट व संलग्न संस्थांच्या वतीने आयोजित या शोभायात्रेचे स्वागत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आ. साजिद खान पठाण यांनी सिटी कोतवाली चौकात भव्य स्वागत कमान उभारत केले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीची महेश नवमी निमित्त सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे स्वागत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आ. साजिद खान पठाण यांनी सिटी कोतवाली चौकात केले. यावेळी महेश भगवान यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी राजेंद्र चितलांगे, प्रकाश सोमाणी, प्रभजितसिंग बचेर, आशिष पनपालिया, डॉ. प्रशांत वानखडे, विजय तिवारी, द्वारका चांडक, भूपेंद्र तिवारी, महेंद्र गवई, जावेद तेली, मोहम्मद इरफान, आकाश कवडे, योगेश कळसकर, राहुल सारवान, अंकुश तायडे, अभिजित तवर, भूषण ताले, मोहम्मद शारिक, भूषण भट्टड, आशिष राठी, लाहोटी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या