मुर्तीजापुर येथे जागतिक सायकल दिन उत्साहात संपन्न
प्रतीनीधी- नागोराव तायडे मुर्तीजापुर
मेरा युवा भारत केंद्र अकोला
युवा कार्यक्रम युवक खेल मंत्रालय भारत सरकार व फिट इंडिया अंतर्गत एनर्जेटिक क्लब मुर्तीजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिनाचे ओचित्त साधून शहरातील सायकल प्रेमींचा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढविला सदर कार्यक्रमाचे आयोजन विलास वानखेडे यांनी केले होते 3 जून हा दिवस सायकलचे एक साधे पडवणारे स्वच्छ आणि शाश्वस्त वाहतुकीचे साधन म्हणून महत्त्व अधोरेखित करणे निरोगी जीवन शैलीला प्रोत्साहन देते आणि हिरवेगार वातावरण निर्मित करते आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकल वापरणे खूप महत्त्वाचे आहे कारण सायकल चालल्याने संपूर्ण जीवन आरोग्यमय व प्रसन्नता वाढवते व पूर्ण शरीर निरोगी राहते असे सायकल प्रेमी व जाणकारांचे मत आहे दिवसेंदिवस सायकल ला खूप महत्त्व येत आहे प्रत्येकाने किमान एक तास स्वतः करिता सायकल चालवणे आजच्या काळात अति आवश्यक आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन मेरा युवा भारत चे विलास वानखडे सह एनर्जेटिक क्लबचे सदस्य रमेश दर्यानी विजय लाकडे नंदू बापू देशमुख शरद गडवाले ऍड दिलीप देशमुख शरद बंग डॉ . बंगाली डॉ .मेंहदि हुसेन गोपाळ घडवाले अविनाश येवले सचिन टापरे संजय फडणाईक बाळासाहेब पवार सचिन लोहकपुरे श्याम हेंगड संजय गिरी रमेश गुप्ता मुन्ना नाईकनवरे साहेबराव सुतारे सुधाकर पाथरे अशोक तिडके रवींद्र डोंगरे नळकांडे सर किशोर टाक दत्ता वाघ इत्यादी नी सहभाग घेतला .
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या