शहर हादरल! 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या
अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या वस्तापूर येथे रात्री झालेल्या वादातून 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश बेहारीलाल ढिगर आणि सेवकराम पतीराम साकुम यांच्यात गावातील बाजार परिसरात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर सेवकरामने मंगेशच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत मंगेशला अकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही दारूच्या नशेत होते. वाद नेमका कशावरून झाला, याचा तपास सुरू असून घटनास्थळी आणि रुग्णालयात पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेतील मृतक व आरोपी दोघेही दारूच्या नशेत होते.


0 टिप्पण्या