Ticker

6/recent/ticker-posts

श्री दत्तात्रय अर्बन बेंकेतील ठेवीदारांना चांगला आर्थिक

श्री दत्तात्रय अर्बन बेंकेतील ठेवीदारांना चांगला आर्थिक



अकोला
श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. अकोला या संस्थेची सुरुवात १९९४ रोजी आज पासुन ३९ वर्षापूर्वी शिवर सारख्या लहानश्या गावातून सुरु होवून या संस्थेचे कार्यक्षेत्र पूर्वी जिल्हा स्तरीय होते त्यानंतर या संस्थेला बहुराज्यस्तरीय दर्जा प्राप्त होवून २०१५ पासुन मल्टीस्टेट महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या क्षेत्रा करिता भारत सरकारने मान्यता दिली.आज संस्थेच्या ११ शाखा असून अकोला बुलढाणा वाशीम जिल्ह्यामध्ये संस्थेचा विस्तार झालेला आहे सध्या संस्थेच्या १०० कोटीच्यावर ठेवी असून त्या पैकी ६० % कर्ज पुरवठा केलेला आहे. संस्था अनेक सामाजिक तथा शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवीत असून अकोला मधील अग्रगण्य संस्था म्हणून संस्थेची महत्वाची भूमिका आहे. नुकताच भारत सरकारच्या सहकार विभाग कडून १९ मे रोजी संस्थेला महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यामध्ये मल्टीपर्पज व मल्टी अॅग्रीकल्चर करिता लायसन मिळाले आहे. आता यानंतर संस्था आपल्या अतिरिक्त दोन दालनाची वाटचाल सुरु करून येत्या आर्थिक वर्षात यामधून संस्थेच्या सभासदांचा तसेच संस्थेच्या ठेवीदारांना चांगला आर्थिक लाभ देण्याचा संस्थेचा मानस आहे त्याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्याची संस्थेला खात्री आहे या दोन्ही विभागात संस्था आपली अग्रक्रमाने वाटचाल करण्यासाठी संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार तसेच हितचिंतक यांना मदतीचे आव्हान संस्थेतर्फे आज पत्रकार परिषदेत करण्यात आली 


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या