Ticker

6/recent/ticker-posts

५ गोमांस जनावरांना चानि पोलिसांनी दिले जीवदान

५ गोमांस जनावरांना चानि पोलिसांनी दिले जीवदान


प्रतिनिधि - गुलाब भाऊ अंभोरे
पातूर तालुक्यातील पोलिस स्टेशन चांनी अंतर्गत येत असलेले चांगेफळ शिवरातून दिनांक - ०८ - ०५ - २५ रोजी सकाळी पहाटे ०५ वाजता ५ गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्या साठी दोन इसम घेऊन जात आहे. अशी गुप्त खबर चांनी पोलिस स्टेशन ला मिळाली असता पोलिस उपनिरीक्षक संजय कोहळे हे अपली पोलिस यंत्रणा घेऊन घटना स्थळी पोहचले असता दोन इसम शंकर राठोड रा. गावंडगाव, किरण मधू पवार राहणार रोहना, तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा. या इसमकडे स्वतःच्या मालकीचे हक्काचे कोणतेच कागदपत्र नसता, कोणता ठोस पुरावा नसता या संशयावरून चांनी पोलिसानी पोलीस स्टेशन ला अनाले असता. त्या ५ जनावरांची एकूण किंमत अंदाजे ४३,००० हजार रु. चां मुद्देमाल त्या आरोपी कडून जप्त केला. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाने विविध कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला. हि सदर कारवाही चांनी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक संजय कोहळे तसेच सुधाकर करवते गोपाळ पोटे, यांनी मा. पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंघ अप्पर पोलीस अधीक्षक अजय डोंगरे. उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, बाळापूर यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आली. पुढील तपास चांनी पोलीस करीत आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या