मूर्तिजापूरात आमदार हरिश पिंपळे यांच्या कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी – वीरता, शौर्य आणि स्वाभिमानाचे स्मरण
प्रतिनिधी - नागोराव तायडे
मूर्तिजापूर (दि. 09 मे 2025)
साहस, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज जनसंपर्क कार्यालय, लक्कडगंज, मूर्तिजापूर येथे त्यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत सुधीर दुबे, योगेश फुरसुले, गोपाल डायमा, आणि भूपेंद्र पिंपळे यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार हरीश पिंपळे म्हणाले, “महाराणा प्रताप हे केवळ एका राज्याचे राजा नव्हते, तर स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान होते. त्यांची युद्धभूमीवरची छाप अशी होती की त्यांच्या नावानेच शत्रू थरथरत असे. अशा महान पुरुषाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञ अभिवादन करतो.”कार्यक्रमाने परिसरात देशभक्तीची भावना जागृत केली. उपस्थितांनी महाराणा प्रतापांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.
0 टिप्पण्या