Ticker

6/recent/ticker-posts

सौ.भारती इंगळे ह्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.भारती इंगळे ह्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित 
 


प्रतिनिधी, संतोष माने 
मुर्तिजापूर मधील स्वरा ब्युटी पार्लर आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या संचालिका सौ.भारती मिलिंद इंगळे यांनी आपल्या कला गुणातून शेकडो बेरोजगार महिला आपल्या कार्यशाळेतून घडविल्या अनेक शाळा,विद्यालये व महाविद्यालये मध्ये महिलांसाठी मार्गदर्शन केले.तसेच कलाविष्कार कला क्रीडा व बहु शिक्षण संस्था भगोरा या संस्थेच्या त्या पदाधिकारी आहेत. त्या मार्फत अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय कार्यक्रम व संमेलने राबविलीत त्याची दखल म्हणून सोलापूरची ए डी फाउंडेशन या संस्थेने २०२५ चा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने निर्मिती हॉल सोलापूर येथे गौरविण्यात आले. शाल ,मेडल , स्मृती चिन्ह व मानपत्र असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
मा.श्री.प्रकाश आण्णा शेंडगे ,माजी आमदार विधानसभा जत तसेच प्रमुख पाहुणे डॉ. नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे, डॉ. सचिन मोटे आयकर आयुक्त मुंबई ,सौ.रुक्मिणीताई गलांडे सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे,राम मांडूरके सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे , डॉ,प्रा.यशपाल भिंगे यांनी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शन केले तर २०२२ ची मिसेस इंडिया विजेत्या श्वेता परदेशी ह्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या.

       सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे...

‌मुख्य आयोजक व संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड हे दरवर्षी संस्थेमार्फत उपक्रम राबवीत असतात आणि विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व कर्तबगार व्यक्तींना सन्मानित करत असतात . या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने, दुर्गामाता चॅरिटेबल फाउंडेशनचे संचालक तसेच समाजसेवक विशाल शिंदे, किर्ती शिंदे फलटन सातारा, कृषी रत्न समाजसेवक महेश उर्फ दौलतराव पाटील सांगली, प्राचार्य प्रशांत पाटील पंढरपूर
व शिक्षक अश्विनीकुमार कस्तुरे नाशिक , ॲड.विधीतज्ञ वैशाली चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
या सत्कार सोहळ्याला कलाविष्कार कला क्रीडा व बहु शिक्षण संस्थेचे संचालक तसेच पत्रकार गझलकार मिलिंद इंगळे आवर्जून उपस्थित होते व त्यांनी आपल्या भाषणातून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा घनश्याम चौगुले यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी दिलीप वाघमोडे,दादासो गोरड,श्री शेंडगे,अशोक सलगर ,शरद माने,सागर म्हारनूर यांनी परिश्रम घेतले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या