Ticker

6/recent/ticker-posts

गोवंश तस्करीवर जिल्हा पोलीस प्रशासनाची निष्क्रियता; बार्शीटाकळीतील मोठी कारवाईही किती परिणामकारक?

गोवंश तस्करीवर जिल्हा पोलीस प्रशासनाची निष्क्रियता; बार्शीटाकळीतील मोठी कारवाईही किती परिणामकारक?

 प्रतिनिधी- संतोष माने

अकोला : बार्शीटाकळी, उरळ, बाळापुर, पातुर, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि जिल्ह्याच्या इतर भागांत गोवंश तस्करी आणि गोमांस विक्रीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक वेळा पोलिसांनी कारवाई केल्याचे जाहीर केले तरी प्रत्यक्षात गुन्हेगार अजूनही बेधडकपणे मोकाट फिरत आहेत. २५ मे रोजी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिपक वारे यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या कारवाईत चोरीस गेलेल्या दोन गायी व एक लाखो रुपयांच्या वाहनासह आरोपी ताब्यात आले.
चोरीस गेलेली गाई अशी होती:


एक पांढऱ्या रंगाची, वय ४ वर्षे, किंमत १७,००० रुपये

एक लाल रंगाची, वय ६ वर्षे, किंमत १२,००० रुपये

या प्रकरणी जयचंद रमेश जाधव यांची तक्रार नोंद झाली होती. पोलिसांनी तिवसा येथील महादेव गजानन कळम याला ताब्यात घेतले; त्याने कबुली दिली की गाई इरशाद उल्ला खा उर्फ गुड्डू याला विकल्या आहेत. इरशाद याच्याकडून ही गाय आणि चोरीस वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईत आणखी तीन आरोपीही निष्पन्न झाले आहेत. या गंभीर कारवाईच्या दरम्यान उरळ पोलिसांनीही दोन दिवसांपूर्वी गोवंश तस्करीविरुद्ध कारवाई केली, पण ती माहिती कुठेही सार्वजनिक करण्यात आली नाही. यामुळे या कारवाई दाबून ठेवण्याचा आरोप जनतेतून जोर धरत आहे.


अकोटमध्ये तर बजरंग दलाचे कार्यकर्ते गोवंश तस्करी थांबवण्यासाठी उपोषणास बसले होते, तर गोरक्षकांनी अनेक वेळा तस्करांना पकडून दिले आहेत. मात्र, आरोपींची वाहने सोडली जातात, काही फरार होतात आणि ज्या आरोपींना अटक होते तेही सैलपणाने सुटतात. मुख्य मोरके अजूनही प्रशासनाच्या पडद्याआड आहेत आणि प्रशासनाला त्यांचा विरोध करण्यासाठी कडक कारवाई करण्याची जाणीव नसल्याचे दिसते. या सर्व बाबतीत पोलीस प्रशासनाकडून आक्रमक कारवाईचा फक्त ढोंग होत असल्याचा आरोप वाढतोय. गुन्हेगारांना कायद्याचा अजूनही भीती वाटत नसल्यामुळे ते बिनधास्तपणे तस्करी आणि विक्री सुरू ठेवत आहेत. सरकार आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून केवळ तात्पुरत्या कारवाया न करता, कडक आणि प्रभावी धोरणे राबवून गोवंश तस्करांना झोडपावे, अन्यथा ही समस्या आणखीनच भयंकर रूप घेणार आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या