Ticker

6/recent/ticker-posts

नायब तहसीलदार धमकी प्रकरण पडले महागात

नायब तहसीलदार धमकी प्रकरण पडले महागात
 

पातूर -प्रतिनिधि - गुलाब भाऊ अंभोरे
 
वाळू माफिया, मुरूम माफियांनी २१ एप्रिल २०२५ रोजी नायब तहसीलदारांच्या दालनात जाऊन जिवे मारण्याची, जाळून टाकण्याची धमकी देऊन दिल्याची घटना घडली होती. प्रहरचा कार्यकर्ता अरविंद पाटील टाकळी खोजवल ता. बाळापूर यांचा मोबाईल स्पीकर ऑन करून त्यातील एका आरोपीने नायब तहसीलदार यांच्या हाती देऊन अरविंद पाटील बोलतो असे म्हणून अश्लील शब्दात शिवी गाळ करून जिवे व गाडी सहित पेटून देण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार झाला होता. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यावरून पातूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. विशेष म्हणजे या घटनेचं ऑडियो रेकॉर्डिंग व्हॉटसअप स्टेटस वर टाकून समाज माध्यमावर व्हायरल करून नायब तहसीलदार यांची बदनामी झाली. त्या नुसार तक्रारी सह ऑडिओ क्लिप, सिसी टिवी फुटेज या सह पुरावा म्हणून पेनड्राईव्ह सहित पोलिस कडे सादर केला. आणि अरविंद पाटील रा. टाकळी खोज्वल तालुका बाळापूर व सचिन निमकाले रा. आसोला व इतर यांच्या विरोधात मागणी केली असता आरोपी विरोधात भारतीय दंड विधानातील कलम - १३२, २९६, ३५१, ( २ ) ३५१ ( ३ )३५६ ( २ ) ३ ( ५ )३ ( १ ) आर. अंतर्गत गुन्हा दाखल केला असून कसून चौकशी सुरु आहे. त्यातील मुख्य आरोपी यांनी शासकीय विश्राम गृह अकोला येथून पातूर पोलिस अटक करून ताब्यात घेतले असता त्याच्या छातीत दुखत असल्यामुळे अकोला जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता आज रोजी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पातूर न्यायालयात हजर करण्यात आले. उर्वरित ४आरोपी अजून फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजलें. त्यातील २ आरोपीची अजून ओळख पटलेली नसून पातूर पोलिस स्टेशन चे पी.आय. हेमंत डोफेवाड तसेच पोलिस उपनिरीक्षक मेश्राम साहेब यांची पोलिस यंत्रणा पुढील तपास करीत आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या