Ticker

6/recent/ticker-posts

बारावीचा उद्या 5 मे ला दुपारी 1 वाजता ऑनलाईन तर दहावीचा जूनमध्ये निकाल

बारावीचा उद्या 5 मे ला दुपारी 1 वाजता ऑनलाईन तर दहावीचा जूनमध्ये निकाल



अकोला
फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेला बारावी परीक्षांचे निकाल 5 मे दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. तर दहावीचा निकाल 5 ते 10 जून दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप मंडळाकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. निकाल mahresult.nic.in  या वेबसाइटवर पाहता येईल. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. दहावीत 89,तर बारावीत 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे. जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता आहे


राज्यातील बारावीचा निकाल उद्या 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर आपली गुणपत्रिका पाहू व डाऊनलोड करू शकतील. तसेच खालील संकेतस्थळांवरही निकाल उपलब्ध राहील: results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, results.targetpublications.org, आणि results.navneet.com.


यासंदर्भात पत्रकार परिषद सोमवार, दिनांक ०५ मे, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेली आहे. तरी सदर पत्रकार आयोजीत केली असल्याची माहीती राज्य मंडळ, पुणे सचीव देविदास कुलाळ यांनी पत्रकाद्वारे कळवीली आहे. 


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या