शॉर्टसर्किटमुळे घराला आग; वडील व मुलगा गंभीर जखमी
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील बाजार पुरा येथे राहणारे सचिन ठाकरे यांच्या घराला शार्टसर्किटमुळे आग लागल्याची माहीती सु्त्रांकडुन प्राप्त झाली आहे. आगीत अडकलेल्या मुलाला वाचविण्यासाठी वडिलाची धडपड दिसून आली. यावेळी बेडरूममध्ये त्यांचा ९ वर्षीय मुलगा स्वराज झोपलेला होता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिल व मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्नीशमन दलाची गाडी सुध्दा दाखल झाली होती. तोपर्यंत गावकऱ्यांनी आग विझविण्यात मदत केली. ही घटना शनिवारी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत सोने-चांदीच्या दागिने अंदाजे किंमत ३ लाख ७५ हजार, कपडे व घरेलू साहित्य अंदाजे किंमत ३ लाख व रोख रक्कम १ लाख ८५ हजार रुपये जळून खाक झाले आहेत. घटनास्थळी एपीआय योगीता ठाकरे, बिट जमादार नीलेश खंडारे नायब तहसीलदार सुनील थेटे, मंडळ अधिकारी मनोहर अढाऊ, तलाठी आशेर परमार्थ यांनी सुद्धा भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 टिप्पण्या