ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेचा खेळखंडोबा; अमरावती-मुंबई एक्सप्रेस मुर्तीजापूरजवळ ठप्प
प्रतीनीधी संतोष माने
मुर्तीजापूर, २४ मे २०२५ – मुंबईकडे जाणाऱ्या अपलाइनवर आज सायंकाळी अचानक वीजपुरवठा करणारी ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. मुर्तीजापूर ते माना दरम्यान ही वायर तुटल्यामुळे अमरावतीहून मुंबईकडे जाणारी १२११२ क्रमांकाची अमरावती-मुंबई एक्सप्रेस गाडी तब्बल आठ वाजल्यापासून रुळावरच उभी आहे.
अचानक उभ्या राहिलेल्या या गाडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, खाण्या-पिण्याच्या सोयी आणि वयोवृद्ध प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत, मात्र अद्यापपर्यंत सेवा पूर्ववत झाली नाही. प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढत असून, यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
0 टिप्पण्या