Ticker

6/recent/ticker-posts

लहानग्या संयमने बनवलेली स्केच कलाकृती आमदार हरिश पिंपळे यांच्या मनाला स्पर्शून गेली – प्रेमभावनेतून मिळाली कामाची प्रेरणा

लहानग्या संयमने बनवलेली स्केच कलाकृती आमदार हरिश पिंपळे यांच्या मनाला स्पर्शून गेली – प्रेमभावनेतून मिळाली कामाची प्रेरणा


तालुका प्रतिनिधी- नागोराव तायडे
मुर्तिजापूर जनतेच्या सेवेत नेहमीच तत्पर असणारे आमदार हरिश पिंपळे यांना आज एका लहानग्याने दिलेली कलात्मक भेट मनाला स्पर्शून गेली. संयम निलेश फुरसुले या लहान मुलाने पेनसिलचा वापर करून आमदार पिंपळे यांचे सुंदर स्केच स्वतःच्या कल्पकतेने रेखाटले आणि त्यांना सप्रेम भेट दिले.ही कलाकृती मिळाल्यानंतर आमदार पिंपळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत संयमचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी म्हटले की, "आपल्यावर प्रेम करणाऱ्या जीवांचे भाव असेच वेगवेगळ्या रूपात भेटत राहतात आणि त्यातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते."


संयमच्या हातून साकारलेले हे स्केच पाहून आमदारांचे मन आनंदाने भरून आले. त्यांनी संयमला आशीर्वाद देत म्हटले की, "तुझं हे कलेचं सामर्थ्य भविष्यात नक्कीच मोठं रूप घेईल. देव तुझ्यावर सदैव कृपा ठेवो!"यावेळी उपस्थित नागरिकांनीही संयमच्या कलागुणांचे कौतुक केले. लोकसेवेतील नेतृत्व आणि नव्या पिढीतील कलावंत यांची ही भावनिक भेट उपस्थितांना प्रेरणादायी वाटली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या