श्रीराम नवमी जन्मोत्सव जल्लोषात साजरा
प्रतिनिधी नागोराव तायडे धन्यवाद सर
श्रीराम नवमी जन्मोत्सव जल्लोषात साजरा पोलीस प्रशासनाने केले उत्सव समितीचे कौतुक मुर्तीजापुर तालुक्यातील असलेले गाव हिरपूर येथील दिनांक 6 4 2025 रविवार रोजी श्रीराम जन्मोत्सव समिती व महिला मंडळ यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव मोठ्या आनंदाने थाटामाटा त फटाक्याचे आतिषबाजी मध्ये शांतीच्या मार्गाने साजरा करण्यात आला होता तत्पूर्वी श्रीराम मंदिर हिरपूर येथे नियोजित ठिकाणी प्रभू श्रीराम यांचे पूजन व हार अर्पण करण्यात आले आणि सकाळी 9:30 चे सुमारात श्री संत शिवानंद दादाजी धुनिवाले बाबा यांचे परमभक्त ह भ प श्री सुरेश हिंगणकर महाराजहिरपूर यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांचा महा अभिषेक होम पूजा व पुष्प पूजा करण्यात आली आहे नंतर सायंकाळी 5:30 च्या दरम्यान नियोजित ठिकाणावरून श्रीराम कथा व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून रथामध्ये संपूर्ण गावांमधून प्रभू श्रीराम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यामध्ये विशेषता महिलांचा सक्रिय सहभाग असून आनंदात फेट्यांच्या तोऱ्यामध्ये गावातील महिला मंडळ यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्सव दिसून आला आहे व त्याचप्रमाणे गाव वाशी यांनी सुद्धा रामनवमी उत्सवाचा आनंद घेतला होता या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे पोलीस बंदोबस्त असून प्रभू श्रीराम यांची भव्य मिरवणूक रामनवमी उत्सव समिती यांनी चांगल्या प्रकारे शांतीच्या मार्गाने कोणत्याही प्रकारे गालबोट न लागता शांतपणे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य अशा मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली त्याबद्दल पोलीस प्रशासनाने उत्सव समितीचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम नवमी सौ विश्वस्त मंडळ हिरपूर सांजा पूर यांनी केले असून कार्यक्रमाचे मार्गदर्शन व आयोजन समितीचे अध्यक्ष श्री किशोर गुल्हाने निलेश गुल्हाने राजू घाटोळ उल्हास गुल्हाने रवींद्र दहीकर प्रवीण धामणे मनोज गुल्हाने गौरव उंबरकर राजू हेमने संदीप चौढाळे पंकज गुल्हाने सुधीर गुल्हाने महेश गुल्हाने शंकरराव ठाकरे अशोकराव राऊत आनंदराव गणोरकर अध्यक्ष जयाजी महाराज संस्थान हिरपूर पप्पू हागे व इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी केले होते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुट्टे साहेब पोलीस कॉन्स्टेबल खंडारे साहेब होमगार्ड पोलीस पाटील गजानन गावंडे इत्यादी पोलीस मित्र यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लाख मोलाचे सहकार्य केले आहे या कार्यक्रमाला गावातील समस्त प्रभू श्रीराम भक्त गाव वाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या