Ticker

6/recent/ticker-posts

वादातून थेट हल्ला! युवतीवर चाकूने वार, आरोपीला अटक

वादातून थेट हल्ला! युवतीवर चाकूने वार, आरोपीला अटक

 प्रतिनिधी- संतोष माने 
बोरगाव मंजू (जि. अकोला) – अकोला जिल्ह्यातील सोनाळा रोडवर रविवारी दुपारी एका २५ वर्षीय तरुणाने २२ वर्षीय युवतीवर धारदार चाकूने पोटात वार करत थरारक प्राणघातक हल्ला केला. या घटनेत युवती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष प्रकाश डिवरे (वय २५, रा. जवळा, जि. अकोला) याने आपल्या कार (MH 24 V 9926) मधून संबंधित युवतीला बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळा रोडवर आणले. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतोषने युवतीच्या पोटावर धारदार चाकूने वार केला.



घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला पसार होण्याच्या प्रयत्नातच अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या