Ticker

6/recent/ticker-posts

दारू बंदीसाठी महिलांच्या १०० सह्यांचे निवेदन

दारू बंदीसाठी महिलांच्या १०० सह्यांचे निवेदन


प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे✍️
पातूर: पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेले ग्राम खानापूर येथील महिला मंडळ व ग्रामस्थांनी १०० महिलांच्या स्वाक्षरी असलेल्या एक दारू बंदीचे निवेदन पातूर पोलिस स्टेशन व तहसिल कार्यालय पातूर तेथे सादर केले. खानापूर येथे १० ते १२ अवैध दारूचे विक्रेते कुणाला न भिता राजरोज अवैध दारू विक्री करत असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत. दारूमुळे कित्येकांचे घरदार, संसार उघड्यावर येऊन उध्वस्त झाले. दारू पिणारे स्वतःला हिरो समजून राजरोज भर रस्त्यावर अश्लील शिवी गाळ करीत असल्यामुळेे महिलांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होत आह. परिसरात शालेय विद्यार्थी असल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होणार त्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तक्रार कर्त्यानी निवेदनात सादर केले आहे. गावकऱ्यांनी कित्येकदा समजावून सांगितले परंतु सर्व प्रयत्न अपयशी ठरले शेवटी गावकऱ्यांनी हा मोठा पवित्रा उचलून पातूर पोलिस स्टेशन ला निवेदन सादर केले. आता यावर प्रशासन नेमकी काय कारवाही करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


पातूर तालुक्यात दारूबंदी साठी अकोला येथील ४ कर्मचारांची निवड केलेली आहे. मग या पथकातील कर्मचारी खरोखरच झोपेचे सोंग घेत आहेत का? मोहाच्या फुलाची दारूमधे विषारी पदार्थ मिसळतात. यामुळे आरोग्याला धोका असते.  त्यामुळे पातूर तालुका मधील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदन कर्त्यांनी दिला. 



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या