Ticker

6/recent/ticker-posts

ईदनिमित्त शहरातील सर्वच मशिदींमध्ये विशेष नमाज अदा

ईदनिमित्त शहरातील सर्वच मशिदींमध्ये विशेष नमाज अदा 


अकोला
पवित्र रमजान महिन्यात सोमवारी ईदनिमित्त शहरातील सर्वच मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाज झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. नमाज अदा करणाऱ्यांच्या सुविधेसाठी शहरातील मुस्लीमबहुल भागांमधील मशिदींव्यतिरिक्त जुने शहर, अकोट फाईल व खदान परिसरातील ईदगाहवर विशेष नमाज करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत सर्वच वयोगटातील मुस्लीम बांधव सकाळीच अल्लाहची करूणा भाकण्यासाठी ईदगाहवर पोहोचले. हरिहर पेठस्थित ऐतिहासिक ईदगाहवर सकाळी १० वाजता मौलाना यांच्या नेतृत्वात ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली.ईदचा अरबी खुतबा पठन केल्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मुस्लीम बांधवांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

          सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे 
अकोट फाईल व खदान परिसरातील ईदगाहवरही विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. ईदनिमित्त पोलिसांनी सर्वच इदगाहवर कडक बंदोबस्त ठेवला होता. शहर आणि जिल्ह्यात अत्यंत शांततापूर्ण वातावरणात व हर्षोल्हासात ईद सण साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन व पोलीस दलाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. यासाठी हरिहर पेठस्थित पोलीस चौकीजवळ मंडप उभारण्यात आला होता. या ठिकाणी जिल्हाधिकारी अजीत कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, आ़ साजीद खान पठान आदींनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या