शहरातील कचरागाडीमधील हिंदीतील गाणं तात्काळ थांबून मराठी मध्ये करा
वंचित बहुजन युवा आघाडी महानगर च्या वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन
अकोला
वंचित बहुजन युवा आघाडी महानगरच्या वतीने महापालिका आयुक्त यांना कचरा गाडी वरील सुरू असणारे हिंदीतील गाणं "गाडी वाला आया भैया कचरा निकाल" हे गल्लो गल्लीत वाजताना दिसते, हे गाणे हिंदीत असून महाराष्ट्रात हिंदी गुजराती बिहारी लोक राहतात की मराठी याचा जाब मा. आयुक्त यांना विचारण्यात आला, यांनी या गाण्याची चौकशी करून, ह्या गाण्यावर किती खर्च करण्यात आला याचाही लेखा जोखा यावेळी आयुक्तांना निवेदन द्वारे मागविण्यात आला, यावेळी आयुक्तांनी वंचित बहुजन युवा आघाडीला आश्र्वस्त करून तत्काळ माहिती घेऊन पुढील कार्य वाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असे आयुक्त यांच्या वतीने कळविण्यात आले, यावेळी बैठकीला वैभव खडसे शहर अध्यक्ष, सूरज दामोदर सोशल मीडिया प्रमुख, साहिल बोदडे सोशल मीडिया प्रमुख, मिलिंद दामोदर तालुका अध्यक्ष , आकाश जंजाळ, सचिन डोंगरे,भूषण वानखेडे,राहुल अहिर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सविस्तर वृत्त येथे 👇 पहावे...
0 टिप्पण्या