Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांच्या जयंतीनिमित्त हेल्मेट वाटप

प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांच्या जयंतीनिमित्त हेल्मेट वाटप


अकोला - माजी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांच्या 5 मार्च रोजी जयंती निमित्त हेल्मेट वाटप चा कार्यक्रमाचे आयोजन अनिल मालगे यांनी केले असून हा कार्यक्रम हॉटेल सेंटर प्लाझा अकोला येथे दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आल्याचे आयोजक अनिल मालगे यांनी कळविले आहे.
माजी आमदार प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास हेल्मेट वाटप करण्याचे नियोजित केले होते . त्यांनी संकल्प केला होता की आपण 50 हेल्मेट वाटप करू परंतु त्यांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष तथा समता परिषदेचे महानगर महासचिव व तेली समाजाचे युवा नेते अनिल मालगे यांनी त्यांचा संकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केले असून पन्नास हेल्मेट वाटप मान्यवरांच्या हस्ते करणार असल्याचे अनिल मालगे यांनी सांगितले .


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या