सिलेंडरचा स्पॉट : दोघे भावांचे घर जळून खाक
पातुर तालुक्यातील राहेर येथील घटना : लाखोंचा नुकसान
प्रतिनिधी :नासीर शेख
पातुर तालुक्यातील राहेर येथे गजानन पाचपोर यांच्या घरात सिलेंडरचा स्पॉट झाल्याची घटना शनिवार दि.१ मार्च रोजीच्या दुपारी घडली, या घटनेमुळे गावात एकच खडबड उडाली होती. गजानन पाचपोर व ज्ञानेश्वर पाचपोर या दोघे भावांचे घर आजूबाजू आहे. गजानन पाचपोर यांच्या घरातील सिलेंडरचा स्पॉट झाल्याने दोघे भावांचे घर जळून खाक झाले, व घरातील अन्नधान्य रोख आदी साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रूपांचे नुकसान झाला आहे. सिलेंडरचा कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झाले नाही मात्र दोघे भावांचे घर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच चान्ना पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार दिनेश झटाले, गोपाल नावकार यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे, तसेच तहसीलदार राहुल वानखेडे यांच्या आदेशानुसार तलाठ्यांनी सुद्धा घटनेचा पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे प्राथमिक अहवाल सादर केला आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने नुकसानीची भरपाई करून देण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकच खजबळ उडाली होती.
आगीचा तांडव गावकरी भयभीत
सिलेंडरचा स्पॉट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा तांडव दिसून आला, त्यामुळे गावकरी भयभीत झाले होते. गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघे भावांचे घर जळून खाक झाले, तोपर्यंत गावकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आला नव्हता,
घर जळाल्याने दोघे भावांचा संसार उघड्यावर
सिलेंडरचा स्पॉट झाल्याने दोघे भावांचे घर जळाल्याने घरातील अन्नधान्य रोख आदी साहित्य जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, दोघे भावांचा संसार उघड्यावर आल्याचे चित्र आहे. शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची गरज आहे.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या