सात बारा कोरा व संपूर्ण कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांनी केले अन्नत्याग आंदोलन यशस्वी
प्रतिनिधी - नागोराव तायडे
मुर्तिजापूर दि.१९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे या सुशिक्षित शेतकऱ्याने व नुकतीच दि.१३ मार्च २०२५ लाभ कैलास नांगरे या राज्य पुरस्कार प्राप्त आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली शासनाने आश्वासन देवून ही कर्ज माफीसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्याने शेतकरी पेटुन उठला आहे. शेतकरी हे देशाचे नागरिक नाहीत काय..? लढा कर्ज माफीसाठी पोटा पाण्याचा उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दि.३१ मार्च पुर्वी सात बारा कोरा करण्याचा पुनर्विचार करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी दि.१९ मार्च रोजी तहसील कार्यालया समोर चिंतन बैठक व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी आम्ही जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे भरीव आश्वासन दिले होते.मात्र झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नाराजीचा सूर उमटत आहे.शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे.सात बारा कोरा व संपूर्ण कर्ज माफीसाठी प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने देण्यात आले होते.पण अजुनही त्या मागणी कडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष न देता फक्त निवडणुकीपूर्वी सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते.त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरीव सभेत आश्वासन दिले होते.आमचे हरीष भाऊ पिंपळे निवडणुकीत विजयी झाले तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते.पण अजुनही त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही.म्हणून आज शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.नापीकीमुळे पुर्वीच शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकरी प्रचंड मेहनत करून आपल्या शेतात धान्याचे उत्पादन करून जर त्यांना त्यांच्या धान्याला हमी भाव मिळाच पाहिजे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व संपूर्ण कर्ज माफीसाठी प्रगती शेतकरी मंडळ जांभा खु, जनमंच नागपूर,न्यु.यंग क्लब, यंग बाॅईज क्लब,आंतर भारती आदी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालया समोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.अन्नत्याग आंदोलनासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील विविध गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.अन्नत्याग आंदोलनाचे प्रमुख प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजु साहेबराव वानखडे,प्रा.सुधाकर गौरखेडे, नंदकिशोर बबानिया, मुन्ना नाईकनवरे, श्रीकृष्ण गुल्हाने, संतोष रद्रकार, श्रीकांत वानखडे, हरीभाऊ वानखडे, अरुण बोंडे, गोपाल बोंडे,प्रा.प्रमोद राजंदेकर,संजय उमाळे, कैलास साबळे, पंकज वानखडे, प्रफुल्ल मालधुरे, प्रकाश राजपूत, किशोर घाडगे, ज्ञानदेव भड, निखिल गावंडे, अरविंद तायडे,प्रितम, देशमुख,किरण नाकट, निरंजन गोरले,संजय घोनशे,सूरेश फुलमाळी,प्रदीप जावरकर, अरुण मुंदाने, सुनील देशमुख, गोपाल मानकर, किशोर गाडगे आदी हजारोंच्या संख्येने शेतकरी या एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनासाठी उपस्थित होते.



0 टिप्पण्या