डॉक्टरला शिवीगाळ आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल
मुर्तिजापूर : उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यास धमकी दिल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी आरोपी अक्षय कैलास ढढोरे (वय 36, रा. वाल्मीक नगर, मुर्तिजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील:
18 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालयात ही घटना घडली. फिर्यादी डॉ. विषाल भुजंगराव येदवर (वय 32, रा. पोळा चौक, मुर्तिजापूर) हे कर्तव्यावर असताना आरोपी अक्षय ढढोरे हा रुग्णालयाच्या परिसरात आला. मागील दोन-तीन महिन्यांपासून तो विनाकारण रुग्णालयात येऊन आरडाओरडा करत होता.
घटनेच्या दिवशीही आरोपीने नेहमीप्रमाणे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. डॉ. येदवर यांनी त्याला शांत राहण्याचे सांगितले असता, आरोपीने संतापून त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच "मादरचोद, माजग्या, बाहेर चल, तुला बघतोच" अशी धमकी देत त्यांना मारण्याची धमकी दिली. यामुळे रुग्णालयातील रुग्ण व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांची कारवाई:
डॉ. येदवर यांच्या फिर्यादीवरून मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 296 (शांतता भंग करणे) आणि 221 (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अरुण मेश्राम करीत आहेत.



0 टिप्पण्या