Ticker

6/recent/ticker-posts

ब्रह्माकुमारीजद्वारे दुर्गुणांची होळी साजरी

ब्रह्माकुमारीजद्वारे दुर्गुणांची होळी साजरी


प्रतिनिधी नागोराव तायडे
ब्रह्माकुमारी शाखा हिरपूरच्या वतीने नाविन्यपूर्ण पद्धतीने दि.13/03/25 ला पारंपारिक होळी साजरी करण्यात आली. 
यावेळेस आपल्या मनात असणारे मत्सर , ईर्ष्या ,द्वेष ,तुलना, अभिमान, मोह हे विविध अवगुण कागदावर लिहून ते कागद जाळुन होळी साजरी करण्यात आली. आपल्यातील अवगुणाना जाळुन तो सोडण्याचा संकल्प होळीच्या समोर सर्वांनी केला. होळीचा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात रंगपंचमी करताना सामाजिक भान ठेवले जात नाही त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक संदेश जावा याकरता परिसरातील कचरा गोळा करून पर्यावरण पूरक थोडी साजरी करण्यात आली. ब्रह्माकुमार सोपानभाई यांनी होळीचे अध्यात्मिक महत्त्व सांगितले. जयाजी महाराज मंदिराचे अध्यक्ष आनंदराव गणोरकर, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय खंडारे साहेब, होले पोलीस , राजुभाऊ खडसे, सुदाम तायडे, बबन भालेराव , सीता गुल्हाने, छाया गावंडे यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. होळी पूजनानंतर सर्वांना नैसर्गिक रंग लावून प्रसाद वाटप करण्यात आला. सर्वांच्या जीवनामध्ये सुखांचे रंग यावेत अशा शुभकामना देण्यात आल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल हेमणे, सुयोग वरेकर, विठ्ठल खंडारे, संजय बंडाळे, दिनेश अवलक, चारोळे, ईशांत राजगुरे, प्रविण ढगे यांनी परिश्रम घेतले.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या