महायुती भाजपाला विजयी करण्यासाठी कामाला लागा- चंद्रशेखर बावनकुळे
अकोला
कार्यकर्ता आणि मतदारांच्या बळावर महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये सरकार आले आहे एक कोटी सभासद करण्याचा विक्रम भाजपा कार्यकर्त्यांच्या बळावर केले असून संघटना पर्वाच्या माध्यमातून दीड कोटी सभासद करण्याच्या अभियानाला गती द्यावी व केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेचा प्रचार प्रसार करावा आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती भाजपाला विजयी करण्यासाठी कामाला लागा असे आव्हान भाजपा प्रदेश अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
स्थानिक सिटी स्पोर्ट मुर्तीजापुर रोड येथे भाजपाच्या अकोला ग्रामीण अकोला शहर अमरावती शहर अमरावती ग्रामीण यवतमाळ पुसद खामगाव बुलढाणा वाशिम जिल्ह्याच्या पश्चिम विदर्भाच्या संघटन पर्व कार्यक्रम अंतर्गत बैठकी ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे होते..
तिच्यावर भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,, सदस्य नोंदणी अभियान प्रमुख राजेश पांडे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैन सुख, संचेती, आमदार डॉक्टर संजय कुटे, पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर, आदिवासी मंत्री नामदार अशोक उईके, खासदार अनुप धोत्रे खासदार अनिल बोंडे प्रवीण पोटे किशोर पाटील जयंत मसने सचिन देशमुख गणेश मांटे, महादेवराव सुपारे, तारेदा बोर्डे, विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल खंडेलवाल आमदार, प्रकशभाऊ भारसकळे आमदार, हरिशभाऊ पिंपळे, सई ताई डहाके, निलय जी नाईक, प्रविनभाऊ तायडे, केवलराम काळे,नितीन भुतडा,जयंत डेहनकर आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नामदार चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निहाय संघटनात्मक सदस्य नोंदणीचा आढावा घेतला व प्रत्येकाने आपला दिलेला टार्गेट पूर्ण करून पक्ष विस्तारासाठी व आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणूक च्या दृष्टीने रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या.
भाजपा पक्ष म्हणजे विश्वास भाजपा म्हणजे विकास हे सूत्र घेऊन जनता जनार्दनाचा आशीर्वाद पक्षाला असून नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असून मोदी यांनी गॅरेंटी त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना एकत्रित करा सभासद नोंदणीच्या माध्यमातून जनसंपर्क करा समाजातील प्रत्येक घटक भारतीय जनता पक्षाची जुळण्यासाठी सज्ज असून विश्वाच्या सर्व सर्वात मोठ्या पार्टीचा सभासद होण्यासाठी व कुंभमेळा हा यशस्वी झाला आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे पैसे सोबत अनेक योजना पूर्ण होत आहे त्यामुळे जनता जनार्दनाचा विश्वास व्यक्त संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपली छबी निर्माण करण्याची ही संधी आहे या संधीचा लाभ घ्या व आपण भाजपाचे सभासद असल्याचा गौरव म्हणून कार्य करा अशी ही यावेळी भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले बैठकीचे सुत्रसंचालक आमदार रणधीर सावरकर तर प्रास्ताविक विक्रांत पाटील यांनी केले. यावेळी 1000 पेक्षा जास्त सभासद करणाऱ्यांचा गौरव सुद्धा करण्यात आला. महसूल मंत्री आणि भाजपा कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रथम आगमन प्रसंगी नामदार बावनकुळे व रवींद्र चव्हाण यांचे जंगी स्वागत भाजपा महानगर आणि ग्रामीण तर्फे करण्यात आले 1728 पदाधिकारी या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते
0 टिप्पण्या