अज्ञात मालवाहू ट्रक कंटेनरच्या धडकेत दोन ठार, राष्ट्रीय महामार्गावरील अनभोरा नजीकची घटना
प्रतिनिधी - नागोराव तायडे
मूर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अनभोरा नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात मालवाहू कंटेनरच्या धडकेत समोरील दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली, अपघातातील गंभीर झालेल्या मृतकाचे नावे मनोज वानखडे व अनिकेत खंडारे भगोरा तालुका मुर्तिजापूर असे मृतक तरुणाचे नाव आहे .
तालुक्यातील भगोरा येथील मनोज वानखडे , अनिकेत खंडारे हे दोघे त्यांची खाजगी कामे आटोपून दुचाकी क्र एम एच ३० एके १९५ या वाहनाने गावाकडे परत येताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने दुचाकीला धडक मारल्याने दुचाकी चकनाचुर होवून रक्ताने माखलेल्या रस्त्यावर दोघा तरूण वयाच्या मुलाचा अपघाती मृत्यू हझाल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले .
सदरच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे व पोलीस स्टॉप सह धाव घेऊन अपघातानंतर काही काळ विस्कटलेली वाहतूक सुरळीत केली व दोन्ही मृतदेहांना मुर्तीजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठीरवाना केले .या घटनेतील अपघातग्रस्त टँकर कंटेनर बोरगावमंजुच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे .
0 टिप्पण्या