Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांवर हमला करणाऱ्यावर कठोर कारवाईच्या आ.सावरकर यांच्या सुचना

विद्यार्थ्यांवर हमला करणाऱ्यावर कठोर कारवाईच्या आ.सावरकर यांच्या  सुचना


अकोला 
अकोला शैक्षणिक हब बदनाम करण्याचा कुटील डाव असामाजिक तत्त्व करत असेल त्याच्यावर पोलिसांनी वचक लावावा व विद्यार्थ्यांना सुरक्षित चांगला वातावरण राहून अकोल्याचे नावलौकिक कायम राहावं या दृष्टीने काय काम करा व ओम भांदूरके या विद्यार्थ्यांवर हमला करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी देऊन भविष्यात असा प्रकार होणार नाही यासाठी जवाहर नगर, रणपिसे नगर राऊतवाडी शासकीय दूध डेरी या भागात पोलीसग्रस्त वाढवण्यात यावी अशा सूचना दिल्या. 


शासकीय दूध डेरी जवाहर नगर या रोडवर मेस वरून माजी आमदार हरिदास भदे यांच्या घराजवळील जेवण करून येत असताना डोणगाव येथील विद्यार्थी व विद्यार्थी ला पैशाची मागणी करून मारहाण करण्यात आली दगडफेक मध्ये त्याच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांना सूचना मिळाल्याबरोबर ताबडतोब सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला धाव घेऊन त्यांनी विद्यार्थ्याला ताबडतोब दवाखान्यात पाठवून सर्व परिमेय मदत करण्याचा अभिवचन दिला तसेच भविष्यात अशा प्रकार होणार नाही या संदर्भात ठाणेदारांना तसेच एसपी शहर सहाय्य पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधून अशा प्रकाराने अकोल्याचे नाव बिघडण्याचा प्रयत्न होत असून याआधी सुद्धा विद्यार्थ्यांची हत्या झाली आता या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचा विषय होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकार होणार नाही दादागिरी खपून घेणार नाही अशा तत्त्वावर कारवाई करण्यात यावी अशा सूचना आमदार सावरकर यांनी देऊन राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहे हे लक्षात ठेवा अशी सूचना देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सजग असून असा प्रकार भविष्यात होणार नाही याची दखल पोलीस प्रशासन आणि घ्यावी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचा वचक संपला का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना होत आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशा सूचना आमदार रवी सावरकर यांनी दिल्या यावेळी आमदार सावरकर यांच्या समवेत डॉक्टर अमित कावरे या भागातील नगरसेवक प्रशांत अवचार माधव मानकर गणेश तायडे विपुल घोगरे किशोर कुचके अनिल मुरूमकर , अमोल साबळे निलेश काकड, संजय लुंगे केशव हेडा, पंकज ठाकरे आधी समवेत होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या