चुकीच्या बाजूने चारचाकी घुसून ऑटोरिक्षाला धडक; प्रवासी जखमी
अकोला
रॉंग साईडने चारचाकी गाडी चालवून एका ऑटोला धडक देऊन पळ काढल्यानंतर कार चालकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चारचाकी गाडी उभी करून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. विरुद्ध दिशेने चार चाकी गाडीने ऑटोला धडक दिल्याने ऑटोचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे, तर यातील प्रवासी सुद्धा जखमी झाले आहे. ऑटोला धडक देऊन फळ काढणारा गाडी मालक दारूच्या नशेत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले असून, हा व्यक्ती मोठा अधिकारी असल्याचं उपस्थितांनी म्हटलं आहे. रिक्षा चालकाने अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात कार चालकाविरुद्ध तक्रार दिली असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत. मात्र गाडी चालक फरार झाल्याने तो नशेत होता किंवा नाही याचा तपास करणे आता सनसमोर आवाहन ठरले आहे.
0 टिप्पण्या