Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, शहरात छापा ०१ आरोपीसह ३१ हजार पाचशे रपयाचा प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, शहरात छापा ०१ आरोपीसह ३१ हजार पाचशे रपयाचा प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा जप्त


अकोला
आगामी येणा-या संकात सणाच्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी केलेल्या सुचने प्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा अकोला चे प्रभारी अधिकारी यांनी अकोला जिल्हयातील नॉयलॉन मांजा विक्री करणा-यांवर कार्यवाही करणे करीता स्था.गु.शा अकोला येथील अधिकारी व अमंलदार यांचे पथके गठीत करून त्या बाबतची माहीती घेवुन कार्यवाही करणे करीता आदेशीत केले असता स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने खालील प्रमाणे कार्यवाही केली आहे.


पो. स्टे डाबकी रोड हददीतील खैर मोहम्मद प्लॉट अकोला येथील आरोपी नामे मोहम्मद अय्याज शेख हसन वय ६० वर्ष, रा. रामपिर नगर, खैरमोहम्मद प्लॉट, डाबकीरोड, अकोला याचे राहते घरी शासनाने प्रतिबंध घातलेला चायना मेड मांजा (नायलॉन दोरा) ज्यामुळे मानवी जिव तसेच इतर सजिव यांचे जिवीतास धोका निर्माण होउ शकतो असा चायनामेड मांजा विक्री करीता बाळगुन विकी करीता मिळुन आल्याने त्याचे जवळुन १) Mono ktc fighter चायना मेड मांजा चे ४२ पिलांडु (बंडल), २) Mono ktc चायना मेड मांजा चे १० पिलांडु (बंडल)., ३) ALL out चायना मेड मांजा चे ११ पिलांडु (बंडल) असे एकुण ६३ पिलांडु (बंडल) प्रत्येकी ५००/ रू प्रमाणे एकुण ३१,५००/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्ती कार्यवाही करून आरोपी व मुददेमाल पुढील कारवाही करणे कामी पो. स्टे डाबकी रोड यांचे ताब्यात देण्यात आले.


सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे सा. यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. सहा. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोहवा फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, पो. कॉ अभीषेक पाठक, आकाश मानकर, धिरज वानखडे, मो. आमीर, मपोका स्वप्ना चौधरी, चालक.पो.कॉ. मनीष ठाकरे यांनी केली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या