रेल्वे स्थानक परिसरात राडा चाकूने केले वार चौघे गंभीर
अकोला
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज 12 जानेवारी दुपारी अकोल्यातील रेल्वे स्थानक परीसरात ढापाजवळ चाकूचा वापर करीत हाणामारी झाली, यामधे जिया अहमद सईद अहमद 49, फैजान अहमद जिया अहमद 22 दोघेही राहणार सोलासो प्लॉट अकोट फाईल अकोला, तसेच इरफान अहमद सईद अहमद 38 व इम्रान अहमद जाफर अहमद 24 दोघेही राहणार ताज चौक इंदिरा नगर अकोट फाईल, असे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. इरफानची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा रामदासपेठ पोलीस संपूर्ण तपास करत आहेत.
0 टिप्पण्या