Ticker

6/recent/ticker-posts

एसटी बस दुचाकीला आदळली; वाहतूक ठप्प

एसटी बस दुचाकीला आदळली; वाहतूक ठप्प



अकोला
राज्य परिवहन महामंडळाची भरधाव एसटी बस समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळून दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे अकोला ते खामगाव मार्गावरील वाहतूक खोळंबली. राज्य परिवहन महामंडळाची अकोला आगाराची एसटी बस क्र. एमएच ४० एन ९९७३ ही तेल्हारा - अकोला बस अकोल्याकडे येत होती. तर बुलडाणा येथील दोघेजण हे अकोल्याकडून खामगावकडे जात होते. अपघातामुळे अकोला ते खामगाव या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. रस्त्यावर नागरिकांनी खूप गर्दी केल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या