Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन

वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन


अकोला
वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ आम्रपालीताई खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली 25 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता कर्मचारी भवन सिव्हील लाईनच्या बाजुला आकाशवाणी समोर अकोला येथे भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. मंगलाताई खिवंसरा,तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महासचिव मा. अरूंधतीताई शिरसाट हे असतील तर स्वागताध्यक्ष म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मा. वंदनाताई वासनिक हे राहतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प. अध्यक्ष तथा महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव मा. संगीताताई अढावू हे राहतील 


दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले ही घटना भारतीय स्त्रि मुक्तीची सोनेरी पहाट होती, या दिनाचे औचित्य साधुन गेल्या २७ वर्षा पासुन २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणुन जाहिर व्हावा अशी एकमुखी मागणी वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. सन २०१५ पासुन शासनाने २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिवस, म्हणुन साजरा करण्याचे फर्मान काढले म्हणजे एक प्रकारे मनुस्मृतीला समर्थन देणे व समस्त स्त्रियांचा अपामन करणे हेच शासनाचे धोरण आहे. या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन, म्हणुन जाहिर करण्यांच्या मागणीसाठी दि. 25 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता स्थळ कर्मचारी भवन, सिव्हील लाईनच्या बाजुला आकाशवाणी समोर अकोला वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष सौ. आम्रपालीताई खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. मंगलाताई खिवंसरा ह्या उपस्थित राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महासचिव मा. अरूंधतीताई शिरसाट हे असतील तर स्वागताध्यक्ष म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मा. वंदनाताई वासनिक हे राहतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प. अध्यक्ष तथा महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव मा. संगीताताई अढावू, जि. प. सभापती मायाताई नाईक, रिजवाना परविन शेख, योगीताताई रोकडे, मा. जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य पुष्पाताई इंगळे, मा. जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, प्रतिभाताई अवचार, शोभाताई शेळके, किरणताई बोराखडे, इंदुताई मेश्राम, मंदाताई कोल्हे, प्रज्ञाताई इंगळे, वैशालीताई वाहुरवाघ, रेखाताई अंभोरे, आशाताई अहिरे, रितीकाताई गोपनारायण, सुनिताताई टप्पे, आम्रपालीताई गवारगुरू, आम्रपालीताई तायडे, शारदाताई सोनटक्के, सरलाताई मेश्राम, राजकन्याताई कवाळकर, सुवर्णाताई जाधव, प्रा. मंतोषताई मोहोळ, ज्योतीताई खिल्लारे आदी राहणार असुन या भारतीय स्त्री मुक्ती परिषदेत विवीध ठरावाचे वाचन करून सदर ठराव एकमताने पारित करून राज्य सरकार व केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहेत. करिता तमाम अकोला जिल्ह्यातील महिलांना हजारोच्या संख्येत या विराट परिषदेला उपस्थित राहाण्याचे आव्हान वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. 


पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महासचिव मा. अरूंधतीताई शिरसाट आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा समाजकल्याण सभापती मा. आम्रपालीताई खंडारे यांनी संबोधित केले तर पत्रकार परिषदेला जिल्हा संघटक अनुराधाताई ठाकरे, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिकभारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पि. जे. वानखडे गुरूजी, मा. जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जि. प. सदस्य निताताई गवई, प्रा. मंतोषताई मोहोळ, जि. प. सभापती रिजवाना परविन शेख, सुवर्णाताई जाधव, संगीताताई खंडारे, वैशालीताई कांबळे, लक्ष्मीताई वानखडे, मायाताई इंगळे, उमाताई अंभोरे, रेखाताई अवचार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या