Ticker

6/recent/ticker-posts

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराज नामकरण

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराज नामकरण 


अकोला 
मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी आणि सनातन प्रेमींना महत्त्वाची भेट देऊन महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा सन्मान केला असून पुन्हा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचं नामकरण करून मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवल्याबद्दल व सर्व वारकऱ्यांचा सनातन प्रेमींचा सन्मान करून हे सरकार राष्ट्रभक्तांचा सरकार असल्याची कृतीने सिद्ध केले आहे त्याबद्दल तमाम अकोले करांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी देवा भाऊ तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व संपूर्ण मंत्रिमंडळाचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे. 


संत तुकाराम महाराज महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आजाराचा स्थान श्रद्धा भक्ती आणि संस्कार सोबत मानवतेचा धर्म शिकवणारे संत होते संसारासोबत भक्ती आणि धर्म विस्ताराचं काम कसं करावं हे महाराजांनी कृतीने सिद्ध केले आहे अनेक संकटातून मात करून संत तुकाराम महाराज यांनी भक्ती आणि विश्वासाचा व सनातन धर्माचा प्रचार प्रसार केला त्यांना नमन करण्यासाठी फुले आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराज विमानतळ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीने खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील जयंत मसने, विठ्ठल महाराज खापरकर, विजय अग्रवाल माधव मानकर गिरीश जोशी, हिरालाल महाराज, वैशाली निकम चंदा शर्मा गीतांजली शेगोकार कुसुम भगत राधिका तिवारी, माधव मानकर, सुमन ताई गावंडे, अशोक राठोड डॉक्टर अमित कावरे अंबादास उमाळे,यांनी सुद्धा सरकारचे अभिनंदन केले आहे ‌


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या