पिंपळखुटा शाळेच्या अध्यक्ष पदी रवी महानकार तर उपाध्यक्ष पदी धीरज वानखडे
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : शिक्षकावर व शाळेच्या इतर कामासाठी शाळेवर नियंत्रण ठेवणासाठी शासनाने शाळा समिती स्थापनेची घोषणा केली, आणि दर दोन वर्षाने नियुक्त केलीली शाळा समिती बरखास्त करून नवीन शाळा समितीची निवड केली जाते. या समितीमध्ये ज्यांचा विध्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहे, अशाच पालकांची शाळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांची निवड केली जाते,याच हेतूने पातूर पंचायत समिती अंतर्गत पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शाळा समितीची शनिवारी नियुक्ती करण्यात अली, यामध्ये अध्यक्ष पदी रवी महानकार तर उपाध्यक्ष पदी धीरज वानखडे तसेच इतर सदस्य यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी सरपंच.पोलीस पाटील शिक्षक तसेच ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्तित होते.
0 टिप्पण्या