सद्गुरु माऊली गजानन महाराज यांची पालखी शेगावी रवाना
मुर्तीजापूर
प्रतिनिधी- नागोराव तायडे
हिरपूर येथील सद्गुरु माऊली गजानन महाराज यांची पालखी शेगावी रवाना गाववासियांनी केले महाराजांच्या पालखीचे स्वागत हिरपूर मूर्तिजापूर तालुक्यातील असलेले गाव हिरपूर येथील मरी माता महिला मंडळ माळीपुरा यांच्या अंतर्गत दिनांक 27 12 2024 शुक्रवार रोजी नियोजित ठिकाणावरून श्री शेत्र शेगावचे सद्गुरु माऊली गजानन महाराज यांच्या पालखीचे शेगावी प्रस्थान करण्यात आले आहे त्यानिमित्ताने महाराजांच्या पालखीची मिरवणूक भ्रमण संपूर्ण गावातून लाऊड स्पीकर साऊंड टाळ मृदंग गीत गायनाच्या गजरात सकाळी 6:30 च्या दरम्यान महाराजांची पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून गावातील भाविक भक्तांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले आहे.
श्री संत गावचे आराध्य दैवत जयाजी महाराज संस्थान मंदिर या ठिकाणी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे विश्रांत करण्यात आले असून त्या ठिकाणी महाराजांची महाआरती करण्यात आली व श्री जयाजी महाराज यांना पुष्पहार अर्पित करून व पूजन करून श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगावी येथे रवाना करण्यात आली असून त्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्त महिला पुरुष गावकरीहिरपूर सांजा पूर वाशी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या