कारंजा तालुक्यातील कामठवाडा येथील धरणात बुडालेल्या ईसमाचा मृतदेह अखेर आज मिळाला
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या रेस्क्यु टीमची यशस्वी कामगीरी,
घटनाक्रम... कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पिएसआय ढीसले सर यांनी 5 नोव्हेंबर रोजी दीलेल्या माहीतीनुसार वाशिम जिल्ह्य़ातील कारंजा तालुक्यातील कामठवाडा येथील धरणात कामठवाडा येथील आकाश सुदाम जाधव वय अंदाजे (24) वर्ष हे 4 नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता बुडाल्याची माहीती येथील प्रविण जाधव सरपंच यांनी दीली होती तेव्हा दोन दिवसापासून स्थानिकांकडून शोध मोहीम राबविण्यात आली परंतु धरणातील स्पाॅट लोकेशन कुणाला माहिती नसल्यामुळे तसेच घरणात 25/30 फुट खोल पाणी असल्यामुळे यश आले नसल्याने तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ पाचारण करण्यात आले तेव्हा लगेच पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी शेखर केवट, अतुल उमाळे,विष्णु केवट, गोपाल गीरे,अपूर्व चके, प्रदीप आडे,यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन काल सकाळी घटनास्थळावर पोहचले आणी 5 नोव्हेंबर पासुन धरणात अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन चालु केले दिवसभर शोध मोहीम राबवुन पुर्ण धरण पिंजून काढले पण काहीच मिळुन आले नाही आज 6 नोव्हेंबर रोजी पुन्हा सकाळपासूनच सर्च ऑपरेशन चालु केले असता धरणातील स्पिचिंग मधे आकाश जाधव यांचा मृतदेह आढळून आला आज सकाळी मृतदेह बाहेर काढून पोलीसांच्या ताब्यात दिला काल पासुन घटनास्थळावर कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पिएसआय ढिसले सर, पो.काॅ.दहातोंडे साहेब, पो.काॅ.सुमित जगताप साहेब,कामठवाडा सरपंच प्रविण जाधव,पुणे शहर पोलीस रतन राठोड साहेब, आणी नातेवाईकांसह नागरिक हजर होते,तसेच कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे सर आणी जि.आ. व्य.अ.शाहु भगत साहेब संपर्क साधुन होते.अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या