महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी संवाद दिवाळी संमेलन- आ. सावरकर
अकोला देशाच्या प्रगतीमध्ये अभियंतांची भूमिका महत्त्वाची असून रेल्वे, सुरक्षा व्यवस्था तसेच अत्याधुनिक वस्तू निर्माण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वस्तूंचा निर्यातीमध्ये वाढ होऊन आयात कमी करण्यात अभियंतांची भूमिका महत्त्वाची असून अमेरिका फ्रान्स ब्रिटनला अभियंता पुरवणारा भारत देश असून या देशातील अभियंताने महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापना साठी महायुतीची शिलेदारांना पुन्हा संधी देऊन विकासाला गती द्यावी. अकोला जिल्ह्यात 2002 ते 2004 मध्ये दुष्काळ पडल्यावर पाण्याच्या टंचाईच्या काळात रेन हार्वेस्टिंग प्रकल्प अभियंतांनी राबवून सामाजिक दायित्व केल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तीनशे फुटाच्या खाली मिळत नव्हते, पाण्याची पातळी वाढवून अभियंतांनी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात संकट काळात मदत केली होती आणि आज महाराष्ट्रात सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता अभियंता एकत्रित येऊन महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी संवाद दिवाळी संमेलन करून बळ देत असल्याबद्दल कोटी कोटी अभिनंदन असल्याचे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांनी केले यावेळी अनुप धोत्रे यांनी अभियंता हा निर्माता असल्यामुळे आपल्या कल्पना दृष्टीने विकासाचा आराखडा तयार करून त्याला साकार देणारा महत्त्वाचा घटक असो शहराच्या विकासामध्ये महत्त्वाचा योगदान असल्याचे प्रतिपादन करून अकोला उमेदवार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार प्रकाश भारसाकडे हरीश पिंपळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले यावेळी किशोर पाटील यांनी महायुतीचा वचननामा चे महत्व सांगितले आमदार सावरकर यांनी केलेल्या कामाचा अहवाल देणारे एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितले यावेळी आमदार वसंत खंडेलवाल जयंत मसने डॉक्टर किशोर मालोकार अभियंता चे संयोजक योगेश मानकर रमण पाटील योगेश फुलकर, सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन, डॉक्टर सतीश उटागले, डॉक्टर युवराज देशमुख, डॉक्टर अमित कावरे अंबादास उमाळे, प्रशांत अवचार राहुल देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या